Join Abhivyakti
स्वप्न पाहण्याचे धाडस केले की कृती करण्याचे धैर्य येते! दीडशे वर्षांपूर्वी सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा दलित मुलींसाठी पहिली शाळा काढली, तेव्हा त्यांचे स्वप्न—जात आणि लिंगापलीकडे समाजातील सर्वांना शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात—बहुतेकांना अशक्यप्राय वाटत होते. पण आज आपण त्या स्वप्नाच्या पूर्ततेत खूप पुढे आलो आहोत; लाखोंच्या संख्येने आज मुली आणि दलित शिक्षण घेत आहेत. म्हणूनच आपणही उच्च स्वप्ने पाहण्यचे धाडस करूया. एका नवीन, सुंदर, न्याय्य—जिथे स्त्री–पुरुष खऱ्या अर्थाने स्वतंत्र आणि समान असतील—अशा नवसमाज निर्मितीचे स्वप्न पाहण्याची वेळ आलेली आहे. पुढाकार घेऊन अशा समाजनिर्मितीसाठी कृती कार्यक्रम राबवण्याची वेळ आलेली आहे. सुरुवात झाली तरच त्याचा शेवट होतो. देशभरात अनेक स्त्रिया आणि पुरुष असा पुढाकार घेताना दिसत आहेत; आपणही आपले लहान-लहान पुढाकार घ्यायला सुरुवात करून पुढे जाऊया. चला, आपण एकमेकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करूया, आपली सुखदुःख आणि समस्या एकमेकांमध्ये समजून घेऊया आणि हातात हात घालून पुढे जाऊया. हळूहळू अधिकाधिक लोक आपल्याला येऊन मिळतील . . .

आम्ही गेल्या काही वर्षांपासून 'अभिव्यक्ती' संघटना म्हणून पुण्यात संघटितपणे काम करत आहोत.आम्हीही तुमच्यासारखेच सर्वसामान्य लोक आहोत.
समाजात प्रश्न लॉकडाऊन पूर्वीही होते आणि लॉकडाऊनमध्ये तर प्रश्नांचे खरे रूप स्वरूप समोर येत आहे. लॉकडाऊनपूर्वीही आम्ही सातत्याने रस्त्यावर समाजात होणाऱ्या अन्यायावर बोलत होतो, विविध माध्यमाने जसं की अभियान-नाटक-प्रदर्शन-विरोध-निदर्शनं करत होतो. महाविद्यालयांमध्ये विविध विषयांवर कार्यक्रम घेत होतो.
अर्थातच लॉकडाऊनमध्येही सोशल मीडियाचा वापर करत आम्ही विविध कार्यक्रम ऑनलाईन करत आहोत. आमच्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही सामील होऊ शकता. तुम्ही एखाद्या ग्रुप/संस्था/संघटने सोबत कार्यरत असाल तर आपण संयुक्त रित्या ही एखाद्या विषयावर काम करू शकतो. वैयक्तिक किंवा गटाने ही सामील होता येईल. आपल्या महाविद्यालय, बचत गट किंवा संस्था-संघटनेसाठी पण आम्ही कार्यक्रम आयोजित करु शकतो.

सावित्रीबाई आणि महात्मा फुल्यांचा वारसा मानणाऱ्या आम्ही जनाबाईच्या लेकी आहोत. विठ्ठलालादेखील जाब विचारण्याचं काम करणाऱ्या आमच्यासारख्या स्त्रियांच्या मनाच्या तळाशी जनाबाईचं आणि बहिणाबाईचं गाणं वाहतं आहे. त्या गाण्याशी तुमचाही सूर जुळला तर आपण सगळेच या कठीण काळात एकत्र राहू.

आम्हाला खालील मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता.  
 वर्षा: 8087637469 
 श्रद्धा: 9270478335

सध्या आम्ही ऑनलाईन ‘अभिव्यक्ती कौटुंबिक सल्ला केंद्र’ ही चालवत आहोत.
संपर्क: ॲड. मोनाली चं. अपर्णा: 9881241415
Sign in to Google to save your progress. Learn more
Full Name/ पूर्ण नाव *
Enter your first name
Sex/ लिंग *
Enter your Gender - Other/Female/Male.
Contact No./ मोबाईल नं. *
Enter your Mobile Number
Email ID/ ईमेल आयडी *
Enter your email id
City/ शहर
Enter the Address or City name
Would you like to join the events that are held in Pune?/ तुम्ही पुण्यामध्ये जे कार्यक्रम आयोजित होतात त्यामध्ये सामिल होऊ शकता का? *
Would you like to join an online program / social media campaign?/ तुम्ही ऑनलाईन कार्यक्रमामध्ये सामिल होऊ शकता का? *
Monetary contribution to Abhivyakti- yearly / monthly / public programs / as per my convenience/ आर्थिक योगदान करु शकता का? *
Would you like to contribute for poster making, writing message for social media?/ आपण अभिव्यक्ती फेसबुक पेज/सोशल मीडियासाठी पोस्टर मेकिंग/ मेसेज लिहू शकता का? *
Why do you think to work/contribute to us? तुम्हाला आमच्या सोबत काम का करावेसे वाटते?
Any Questions?/ अजून काही प्रश्न?
Submit
Clear form
Never submit passwords through Google Forms.
This content is neither created nor endorsed by Google. Report Abuse - Terms of Service - Privacy Policy